Mahanubhav Panth...
महानुभाव पंथ --- -इ.स.१२०० च्या सूमारास महाराष्ट्रात महानुभाव संप्रदाय उदयास आला. “महान अनुभवोस्तेजा बलं वा यस्य सः महानुभावः” या दृष्टीने मोठा तेजाने युक्त असलेल्या लोकांचा मार्ग, तो महानुभाव पंथ, असे म्हटले जाते. या संप्रदायाची संस्थापना सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामींनी केलेली असली तरी, मूळात त्यांनी या पंथास स्वतः कोणतेही नांव दीलेले नव्हते. सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामींच्या उत्तरापंथे गमना नंतर, जेव्हा पंथाची धुरा नागदेव आचार्यांच्या खांद्यावर आली, त्याकाळी या पंथास “भटमार्ग” असे संबोधल्या जाऊ लागले. “महानुभाव पंथ” या नावने हा पंथ जरी आज ओळखला जात असला, तरी त्याची “महात्मा पंथ”,”अच्युत पंथ”,”जयकृष्णी पंथ”,”परमार्ग” अशी अन्य नावेही पूढील काळात उदयास आली. काही भागात “अच्युतपंथ” उत्तर भारतात “जयकृष्णीपंथ” ही नावे याच पंथाची आहेत.<br/>इ.स.१२०० हा कालखंड महाराष्ट्रातील ऐश्वर्याचा आणि समृद्धीचा कालखंड समजला जातो. देवगिरीच्या मराठी यादवांची कारकीर्द या वेळी महाराष्ट्रात होती. समाजात चातुर्वर्ण्यांची मिरासदारी वाढलेली अस
Read More